सर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.
शेवटचा भाग
या शेवटच्या भागात विद्यासागर अकॅडेमीच्या लॅबमध्ये तयार केलेले आणि संपूर्णपणे टेस्ट केलेले वेगवेगळे प्रोग्राम्स खाली दिले आहेत. यातील कोणताही प्रोग्राम आपल्या डेव्हलपमेंट बोर्डमध्ये बर्न करण्यासाठी, पहिले Keil uVision3 मध्ये हा प्रोग्राम लिहा आणि कम्पाइल करा. त्यानंतर त्याची हेक्स फाईल मायक्रोकंट्रोलरमध्ये बर्न करा.
विद्यासागर अकॅडेमीत ८०५१ मायक्रोकंट्रोलरची संपूर्ण किट उपलब्ध आहे. या किटमध्ये प्रोग्रामिंग आणि रोबोटिक्सच्या अभ्यासासाठी लागणारे सर्व साहित्य दिले आहे. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.
अभ्यासासाठी तयार केलेले बेसिक प्रोग्राम्स
- एक LED ब्लिंक करण्याचा कोड
- सर्व ८ LEDs विविध पद्धतीने ब्लिंक करण्याचा कोड
- रोबोट मागे आणि पुढे चालविण्याचा कोड
- ब्लॅक लाईन वर चालणारा रोबोट
- व्हाईट लाईनवर चालणारा रोबोट
- टेबलावर चालणारा रोबोट (टेबलावरून खाली न पडता हा रोबोट चालत राहतो)
- अडथळे वाचवून चालणारा रोबोट
अभ्यासासाठी तयार केलेले कठीण प्रोग्राम्स
- LED डिस्प्ले कंट्रोल करणारा कोड
- मोबाईलद्वारे आपल्या घरातील उपकरणे नियंत्रित करा
- रिमोट काँट्रोल्ड रोबोटचा सोपा कोड
- रिमोट काँट्रोल्ड आणि टेबलावर न पडता चालणारा रोबोट
- रिमोट कंट्रोल्ड रोबोटिक आर्म
- हावभावांप्रमाणे कंट्रोल करता येणारा रोबोट
- ८०५१ मायक्रो कंट्रोलर सोबत सर्वो मोटर कशी वापरावी?
- ८०५१ मायक्रो कंट्रोलर मधील टायमर झिरो कसा वापरावा?
तर मित्रांनो, अशा प्रकारे हा कोर्स इथे पूर्ण झाला, म्हणजे माझ्या बाजूने पूर्ण झाला. मात्र तुम्हाला यातून पुढे खूप शिकायचे आहे. वर दिलेला प्रत्येक प्रोग्राम नीट समजून घ्या. त्यातील प्रत्येक लाईनचे काय कार्य आहे, ते समजून घेणे महत्वाचे आहे.
विद्यासागर अकॅडेमीच्या “८०५१ रोबोटिक्स कोर्स” साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. या कोर्समध्ये अतिशय सोप्या पद्धतीने अगदी बेसिक गोष्टींपासून रोबोटिक्सचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो.
गेल्या ८-९ वर्षांपासून विद्यासागर अकॅडेमीत बेसिक रोबोटिक्स, ऍडवान्सड रोबोटिक्स, Arduino रोबोटिक्स, Raspberry Pi रोबोटिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि PCB डिझाईनिंग इत्यादी कोर्सेस अत्यंत माफक फी घेऊन, संपूर्ण प्रात्यक्षिकांसहित शिकविले जातात. प्रत्येक कोर्स मध्ये विद्यार्थ्याला (स्वतःचे म्हणून घरी प्रयोग करण्यासाठी) संपूर्ण साहित्य दिले जाते. या साहित्याची वेगळी फी आम्ही घेत नाही.
आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी विद्यासागर अकॅडेमीत हे विविध कोर्सेस केले आहेत. येथे शिकलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव काय आहेत, ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
विद्यार्थ्यांना अत्यंत माफक फीमध्ये जास्तीतजास्त चांगले मार्गदर्शन आणि साहित्य मिळावे हाच विद्यासागर अकॅडेमीचा शुद्ध हेतू आहे.
तर मित्रांनो, हा ८ भागांमध्ये विभागलेला कोर्स तुम्ही आपल्या घरी बसूनही करू शकता. त्यासाठी तुम्हाला विद्यासागर अकॅडेमीने तयार केलेल्या साहित्याची आवश्यकता आहे. हे साहित्य विकत घेण्यास या लिंकवर क्लिक करा.
जर तुम्हाला विद्यासागर अकॅडेमीत येऊन हा कोर्स प्रत्यक्षपणे करावयाचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. १५-१५ दिवसांचे हे कोर्सेस, विद्यासागर अकॅडेमीत वर्षभर चालू असतात. रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करा.
म्हणून मित्रांनो, आपला अभिप्राय कळविण्यास विसरू नका.
या कोर्ससंबंधी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण अथवा काही प्रश्न असल्यास मला ई-मेल करू शकता.
ई-मेल: dsvakola@gmail.com
सेलफोन: ९९-६०-९९१-९९१