Blog

मराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – १

सर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.

Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name.

भाग पहिला

८०५१ मायक्रोकंट्रोलर हा शिकण्यास अतिशय सोपा आहे, पण त्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या मूलभूत गोष्टी शिकणे आवश्यक आहे.

या मायक्रो कंट्रोलरची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:

८०५१ मायक्रोकंट्रोलरच्या theory बाबत जास्त खोलात जाणे हा या उपक्रमाचा उद्देश नाही. आपल्याला लवकरात लवकर ८०५१ मायक्रोकंट्रोलरचे बेसिक प्रोग्रामिंग कसे करता येईल, या गोष्टीवर आपण भर देणार आहोत.

तेव्हा मित्रांनो, चला तर आपण आता सुरु करूया…!

सुरुवातीला आपण ८०५१ मायक्रोकंट्रोलरचे अंतर्गत स्वरूप (internal structure) समजावून घेऊ. खाली दिलेली आकृती पहा.

८०५१ मायक्रोकंट्रोलरचे अंतर्गत स्वरूप

८०५१ मायक्रोकंट्रोलरचे अंतर्गत स्वरूप

वरील diagram मध्ये ८०५१ मायक्रोकंट्रोलरच्या समूहातील AT89S52 या मायक्रो कंट्रोलर चे pin configuration दाखविले आहे.

खालून डावीकडील पहिली पिन आहे पिन-१. असेच आपण पुढे मोजत गेलो कि खालची उजवीकडील पिन आहे पिन-२०. तेथूनच मग वर गेलो कि पिन-२१ आणि तेथून डावीकडे मोजत गेलो की शेवटची पिन आहे, पीन-४०.

अशा प्रकारे या मायक्रो कंट्रोलर ला ४० पिन्स आहेत.

८०५१ मायक्रो कंट्रोलरचा डेव्हलपमेंट बोर्ड असा दिसतो

८०५१ मायक्रो कंट्रोलरचा डेव्हलपमेंट बोर्ड असा दिसतो

आता ८०५१ मायक्रो कंट्रोलर चे प्रोग्रामिंग आणि त्या अनुषंगाने रोबोटिक्स शिकण्यासाठी आपल्याला यातील फक्त ३२ पिन्स लक्षात ठेवायच्या आहेत. या ३२ पिन्स चे चार भाग आहेत: PORT-0 (पोर्ट झिरो), PORT-1 (पोर्ट वन), PORT-2 (पोर्ट टू) आणि PORT-3 (पोर्ट थ्री).

या प्रत्येक पोर्ट मध्ये ८ पिन्स आहेत. प्रत्येक पिन चा एक विशिष्ट नंबर आहे, तो कसा वाचायचा आणि अनुक्रमे लक्षात ठेवायचा ते आता पाहू.

वरील diagram पुन्हा नीट पहा.

प्रत्येक पिन समोर त्या पिनचा क्रमांक आणि त्याखाली फंक्शन लिहिले आहे. सध्या आपल्याला प्रत्येक पिन चा फक्त नंबरच लक्षात ठेवावयाचा आहे. जसे –

पिन नंबर १ आहे – P0.0 किंवा P0^0.

प्रत्येक पिन चा नंबर वाचताना असा वाचा – पी झिरो डॉट झिरो किंवा पी झिरो कॅप झिरो.

याप्रमाणे पुढची पिन आहे पिन नंबर २, म्हणजेच P0.1 किंवा P0^1 अर्थात पी झिरो डॉट वन किंवा पी झिरो कॅप वन.

याप्रमाणे पुढच्या पिन्स आहेत: P0^2, P0^3, P0^4, P0^5, P0^6, P0^7.

अर्थात PORT0 (पोर्ट झिरो) मध्ये ८ पिन्स आहेत: P0^0, P0^1, P0^2, P0^3, P0^4, P0^5, P0^6, P0^7.

याप्रमाणे PORT1 (पोर्ट वन) मधील ८ पिन्स अशा आहेत: P1^0, P1^1, P1^2, P1^3, P1^4, P1^5, P1^6, P1^7.

PORT2 (पोर्ट टू) मधील ८ पिन्स अशा आहेत: P2^0, P2^1, P2^2, P2^3, P2^4, P2^5, P2^6, P2^7.

आणि शेवटी PORT3 (पोर्ट थ्री) मधील ८ पिन्स अशा आहेत: P3^0, P3^1, P3^2, P3^3, P3^4, P3^5, P3^6, P3^7.

अशा प्रकारे आपल्याला ३२ पिन्स चे नंबर्स लक्षात ठेवायचे आहेत आणि तेही अनुक्रमाने…! सोपे आहे, नाही का…?

म्हणजे मी जर तुम्हाला विचारले कि P1^3 हि कोणती पिन आहे तर तुम्हाला ती वाचता आली पाहिजे, तिचा पोर्ट मधील अनुक्रमांक काय आणि ती कोणत्या पोर्ट मध्ये आहे ते सांगता आले पाहिजे…!

जसे P1^3 हि पिन PORT1 मधील चवथी पिन आहे. P3^4 हि पिन PORT3 मधील पाचवी पिन आहे, वगैरे…

जमेल ना…? सहज…! नाही का? ओके! आता पुढील भाग पहा…

I/O PORT (आय-ओ पोर्ट) म्हणजे काय?

मायक्रो कंट्रोलर मधील या ३२ पिन्स पैकी प्रत्येक पिन ला I/O (आय/ओ पिन) असे म्हणतात. आय ओ पिन म्हणजे इनपुट आउटपुट पिन. अर्थात आपण यातील कोणत्याही पिन वरून, मायक्रो कंट्रोलर च्या आतून बाहेरच्या जगात आउटपुट पाठवू शकतो किंवा बाहेरून मायक्रो कंट्रोलर च्या आत इनपुट घेऊ शकतो.

यातील कोणत्या पिन ला इनपुट किंवा आउटपुट पिन बनवायचे, हे आपण आपल्या प्रोग्राममध्ये, विशिष्ट प्रकारे कोडिंग करून ठरवू शकतो. ते कशा प्रकारे करायचे हे आपण नंतर पाहणारच आहोत. त्याकरिता आपल्याला पुढील धड्यामध्ये  लँगवेजचे बेसिक शिकायचे आहे.

तयार आहेत तुम्ही…??? तर मग पुढील धड्याची वाट पहा…!

Comments on this entry are closed.

 • Sunil Mahindre

  February 20, 2018, 1:55 PM

  वर्ग 12 चे पहिले वर्ष कसे बसे निघाले आता परत वर्ग 12 चे कसे करावे ही भिती मनात होती पण आता तुमच्या मुळे confidence आला व वाटणारी अनावश्यक भिती नाहिसी झाली धन्यवाद

  • Dattaraj Vidyasagar

   February 21, 2018, 12:17 AM

   धन्यवाद सर
   थँक्यू व्हेरी मच…!

 • विशाल

  February 19, 2018, 1:24 PM

  मराठीतून मायक्रोकंट्रोलर, अतिशय छान प्रयत्न आहे सर, ह्यामूळे केवळ इंग्लिश मिडीयम च नव्हे तर मराठी मिडीयम चे मुले सुद्धा शिकू पाहतील व नक्कीच साधारण मुलांना सुद्धा अशा सोप्या पद्धतीने शिकता येईल.
  अतिशय उत्कृष्ट उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.

 • Ujwala Garud

  February 19, 2018, 1:39 AM

  सर आपण 8051 pin config.मधील 32 pins लक्षात ठेवण्याचे टेक्निक इतक्या सहज सोप्या शब्दात स्पष्ट केले आहे की 8051 ,C Lang.,व Opert. system या lessons साठी मनात असलेली भिती आत्तापासूनच निघुन गेली.खुप खुप धन्यवाद सर.

 • Balkrishna Surve

  February 18, 2018, 10:37 PM

  सर आपले लिखान समजायला खूप सोपे आहे. त्यामुळे नविन विषयाची भीती निघून जाते. आपले सर्व धडे वाचायची आतूरता झाली आहे. Keep it up

  • Dattaraj Vidyasagar

   February 18, 2018, 10:55 PM

   धन्यवाद सुर्वे सर.
   मी लवकरच नवीन धडा प्रकाशित करीत आहे.

   • prashant tammewar

    February 20, 2018, 2:43 PM

    मराठीतून मायक्रोकंट्रोलर, अतिशय छान प्रयत्न आहे सर, ह्यामूळे केवळ इंग्लिश मिडीयम च नव्हे तर मराठी मिडीयम चे मुले सुद्धा शिकू पाहतील व नक्कीच साधारण मुलांना सुद्धा अशा सोप्या पद्धतीने शिकता येईल.
    अतिशय उत्कृष्ट उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.

    • Dattaraj Vidyasagar

     February 21, 2018, 12:17 AM

     धन्यवाद सर
     थँक्यू व्हेरी मच…!