Blog

इंटरनेटच्या जगात तुमची ओळख निर्माण करा. Gravatar बनवा.

Gravatar म्हणजे Globally Recognised Avatar. काही लोक त्याचा उच्चार ग्रवतार किंवा GR अवतार असा करतात. तुमचा Gravatar म्हणजे तुमची एक image आणि तुमची विशिष्ट प्रोफाईल.  Gravatar चा फायदा असा आहे कि, इंटरनेटवर तुम्ही ज्या ज्या website वर जाऊन comment कराल, किंवा काही पोस्ट कराल,  त्यावेळी तुमचा email address तेथे लिहिल्यानंतर तुमचा छोटासा photo आणि तुमचे नाव त्या पेजवर अपोआप दिसू लागते, उदाहरण पाहण्यासाठी इथे क्लिक करा. आणि जर कोणी तुमच्या image वर mouse cursor नेला, तर त्याला तुमची एक विशिष्ट प्रोफाईल सुद्धा दिसते. Gravatar मुळे तुमची ओळख जगभर प्रसारित होण्यास मदत होते. तुम्ही ज्यावेळी कोणाला email पाठवाल त्यावर सुद्धा तुमचा Gravatar तुम्हाला प्रसारित करता येतो.

आपली नेमकी कोणती माहिती आपल्या प्रोफाईल मध्ये दिसावयास हवी हे तुम्ही ठरवू शकता. वाट्टेल तितके तुमचे photo बदलू शकता, तुमचा photo नको असेल तर एखादे सुंदर चित्र दाखवू शकता किंवा तुमचा Gravatar तुम्ही delete सुद्धा करू शकता. Gravatar delete केल्याबरोबर संपूर्ण जगात तुमची माहिती दिसणे तत्काळ बंद होते. सुंदर कल्पना आहे कि नाही, मित्रांनो! WordPress ह्या जगप्रसिद्ध फौंडेशनने Gravatar ची सुंदर कल्पना शोधून काढली आणि आज जगभरात कोट्यावधी व्यक्ती gravatar चा उपयोग करत आहेत आणि दररोज त्यात लाखोच्या संख्येने वाढ होत आहे. चला तर मग, आपणही ह्या संख्येत ‘एक’ ने भर घालूया…

तुमचा gravatar बनविण्यासाठी तुमचा स्वतःचा email address असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तो बनविला नसेल, तर इथे क्लिक करा. Gravatar बनवण्याची प्रक्रिया करण्याआधी तुमच्या computer मध्ये तुमचे एक-दोन photo (closeup असतील तर फारच चांगले) असणे आवश्यक आहे. चला तर मग, खाली दिलेल्या स्टेप्स नीट वाचून त्याप्रमाणे करा…

 • ह्या लिंकवर क्लिक करा. एक नवी window उघडेल आणि त्या पेजवर तुम्हाला खालीलप्रमाणे एक निळे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
 • बटनवर क्लिक केल्यानंतर बाजूला दाखविल्याप्रमाणे एक form दिसेल.
 • पहिले तुमचा email address लिहा.
 • त्यानंतर तुमचे username लिहा. तुम्ही इथे कोणतेही username लिहू शकता, परंतु तुमचा email address करता असलेले username लिहिणे जास्त चांगले. कारण वेगवेगळ्या प्रकारचे username लक्षात ठेवणे कठीण असते.
 • शेवटी तुमचा password लिहा. इथे तुम्ही password पाहिजे तो लिहू शकता. password टाईप केल्यानंतर enter करा, किंवा ‘Sign Up’ ह्या बटनावर क्लिक करा.
 • आता तुमचे email account तुम्हाला चेक करायचे आहे. कारण तुमच्या email address वर WordPress ने तुम्हाला confirmation email पाठविली आहे. ती email ओपन करा.
 • त्यामध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे एक message दिसेल.

Confirmation details

 • त्यामधील  “Activate Account” ह्या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर पुन्हा दुसरे पेज उघडेल. आणि खालीलप्रमाणे message तुम्हाला दिसेल. आता तुमचे email account WordPress.com वर रजिस्टर झाले.

Verification and confirmation welcome message

 • ह्या message मध्ये दिसणाऱ्या ‘Sign in to Gravatar’ ह्या बटनावर क्लिक करा. आता नवीन पेज open होईल आणि त्यामध्ये वर दिसणाऱ्या ‘My Profile’ ह्या लिंकवर क्लिक करा.
 • समोर दिसणाऱ्या फोर्म मध्ये तुमची माहिती भरा व फोर्म save करा.
 • त्यानंतर उजव्या बाजूला वर mouse cursor नेल्यावर तिथे तुम्हाला खालीलप्रमाणे image दिसेल. त्यामध्ये ‘Add an image’ वर क्लिक करा आणि त्यानंतर ‘My Computer’s hard drive’ ह्या बटनवर क्लीक करा.
 • शेवटी तुमचा photo select करून तो upload करा. झाले. तुमचा Gravatar तयार झाला.
 • आता एक १० मिनिटे तुम्हाला थांबावे लागेल कारण तुमची image आणि प्रोफाईल जगातील सर्व ठिकाणी प्रसारित करण्यासाठी इंटरनेटवर थोडा वेळ लागेल.
 • १० मिनिटानंतर ह्या लिंकवर क्लिक करा किंवा स्क्रोलडाऊन करा. तुमची ह्या article वर काय comment आहे ते लिहा आणि ‘Submit’ बटन क्लिक करा.
 • पहा, तुमची image तुम्हाला दिसत असेल.
 • अभिनंदन! तुमचा gravatar तयार झाला.

Comments on this entry are closed.

 • Admin

  August 18, 2015, 4:55 PM

  This is one comment written by Admin of Vidyasagar Academy.

  Observe the Gravatar – logo of Vidyasagar Academy. This creates your personal identity on global level.